Homeताज्या बातम्याजळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता १० हजारांची...

जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी व कनिष्ठ अभियंता १० हजारांची लाच घेताना जाळ्यात!

मुख्य संपादक विनायक पाटील

९ लाखांच्या रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजारांची मागणी; तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारताना एसीबीची धडक कारवाई, दोन्ही शासकीय कर्मचारी अटकेत

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बांधकाम विभागातील दोन शासकीय अधिकाऱ्यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. श्री. सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५, उपविभागीय अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जळगाव) आणि श्री. भागवत वसंत चव्हाण (वय ३२, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत.

एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांनी सन २०२५-२६ मध्ये धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे गावांतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाचे ९ लाख १० हजार ७६३ रुपयांचे काम केले होते. या कामाची एम.बी. (मोजमाप पुस्तिका) आणि बिले तयार करण्यासाठी कनिष्ठ अभियंता भागवत चव्हाण यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून २० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.

त्यानंतर कामाचे बिल मंजुरीसाठी जिल्हा परिषद कार्यालयात प्रलंबित असताना उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांनी एकूण बिलाच्या १.५ टक्के म्हणजे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी एसीबीने पडताळणी व सापळा कारवाई केली. यावेळी कनिष्ठ अभियंता भागवत चव्हाण यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष १० हजार रुपये स्वीकारून ते उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्याकडे दिले. त्यानंतर शिसोदे यांनीही ही रक्कम स्वीकारली. एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात पकडून लाचेची रक्कम जप्त केली.

आरोपींच्या अंगझडतीत शिसोदे यांच्याकडे ॲपल कंपनीचा मोबाईल व ११ हजार ६२० रुपये रोख, तर चव्हाण यांच्याकडे विवो कंपनीचा मोबाईल व २० हजार ६०० रुपये रोख रक्कम आढळून आली.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

एसीबीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा पथकात पोलीस निरीक्षक रेशमा अवतारे यांच्यासह पोलीस अंमलदारां चा सहभाग होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!