Homeताज्या बातम्याचोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

मुख्य संपादक विनायक पाटील 

सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील ग्रामीण औद्योगिक वसाहतीमध्ये चोरट्यांनी एका वेल्डिंग वर्कशॉपला लक्ष्य करत शटरचे कुलूप तोडून सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वर्कशॉपचे मालक महेंद्र भिका चौधरी (वय ५२, रा. प्लॉट क्रमांक ४७, गंगाई नगर क्र. १, चोपडा) यांनी २० नोव्हेंबर २०२६ रोजी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार, महेंद्र चौधरी यांचे ग्रामीण औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक १५ येथे ‘सुपर वेल्डिंग वर्क्स’ नावाचे वर्कशॉप आहे. या ठिकाणी ते स्वतःसह पाच मजूर काम करतात. वर्कशॉपमध्ये लोखंडी दरवाजे, खिडक्या तसेच विविध वेल्डिंगची कामे केली जातात. काम संपल्यानंतर रात्रीच्या वेळी वर्कशॉपमधील साहित्य आत ठेवून शटरला कुलूप लावण्यात येते.

१८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास वर्कशॉप बंद करून मालक घरी गेले होते. त्यानंतर १९ नोव्हेंबर रोजी सकाळी वर्कशॉपवर आल्यानंतर शटरचे कुलूप तुटलेले दिसून आले. मात्र, त्यावेळी साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. पुढे २० नोव्हेंबर रोजी सकाळी पुन्हा वर्कशॉपवर गेले असता शटरचे कुलूप तोडून आत चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी अंदाजे १५ हजार रुपये किमतीच्या सुमारे ५० किलो वजनाच्या दहा लोखंडी प्लेट तसेच अंदाजे ८० हजार रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन आणि एक ड्रिल मशीन असा एकूण ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, वर्कशॉपमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असूनही चोरट्यांनी चोरी करताना काळजीपूर्वक कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनेची दखल घेऊन तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण औद्योगिक वसाहतीत वर्कशॉप फोडून चोरी झाल्याने परिसरातील व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

चोपडा नगरपरिषद उद्यानात स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण ‘दीपवंदना’ कार्यक्रम; हजारो पणत्यांनी उजळले परिसर

0
मुख्य संपादक विनायक पाटील    चोपडा (प्रतिनिधी) : स्वर्गीय आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी सुनिल पाटील (वाळकी, चोपडा, जळगाव) यांच्या संकल्पनेतून चोपडा येथील नगरपरिषद उद्यानात...

Translate »
error: Content is protected !!