Homeताज्या बातम्याचोपडा नगरपरिषदेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची चौकशी करा; सेवा फाउंडेशनला काळ्या यादीत...

चोपडा नगरपरिषदेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची चौकशी करा; सेवा फाउंडेशनला काळ्या यादीत टाका!नगरसेवक नरेंद्र पाटील

मुख्य संपादक विनायक पाटील 

नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप; मुख्याधिकारी व स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी

चोपडा(प्रतिनिधी)-चोपडा नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन कामकाजात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगरसेवक नरेंद्र साहेबराव पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच चोपडा नगरपरिषदेच्या कचरा डेपोला लागलेल्या आगीची वायू प्रदूषण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडे दि.३ रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दि.१२ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, जळगाव तसेच चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे कामकाज आणि पुणे येथील सेवा फाउंडेशन या संस्थेमार्फत सुरू असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता.मात्र, या प्रकरणाची चौकशी सुरू होण्यापूर्वीच दि.२५ ऑक्टोबर २०२६ रोजी कचरा डेपोवरील संपूर्ण साचलेला कचरा जाळण्यात आल्याचा गंभीर आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ही घटना घडल्याने चौकशीतील संभाव्य पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानेच कचरा जाळण्यात आला का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

कचरा डेपोला आग कशी लागली, याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे विचारणा केली असता महावितरणच्या विद्युत खांबावरील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र, विरोधी नगरसेवकांनी प्रत्यक्ष कचरा डेपोला भेट दिली असता त्या ठिकाणी महावितरणचे विद्युत खांब किंवा वीजतारा आढळून आल्या नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.त्यानंतर स्वच्छता विभागाकडे पुन्हा विचारणा केली असता कचऱ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ तयार झाल्यामुळे आग लागली असावी, असे वेगळे उत्तर देण्यात आल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. प्रशासनाकडून परस्परविरोधी उत्तरे दिली जात असल्याने या प्रकरणात ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

घनकचरा व्यवस्थापनातील कथित भ्रष्टाचार आणि आग लागण्याच्या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तीन स्वच्छता निरीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय स्वच्छता विभागातील दोन संगणक चालक, एक शहर समन्वयक आणि एका शिपायाची तात्काळ बदली करावी. तसेच पुणे येथील सेवा फाउंडेशन या संस्थेची चौकशी करून दोष सिद्ध झाल्यास संस्थेला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही नगरसेवक नरेंद्र साहेबराव पाटील यांनी केली आहे.निवेदन देताना नरेंद्र पाटील भाजपा अध्यक्ष तथा नगरसेवक,रणजित देशमुख सामाजिक कार्यकर्ता, प्रकाश पाटील,राज पाटील युवा मोर्चा शहराध्यक्ष, पवन जयस्वाल आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!