मुख्य संपादक विनायक पाटील
प्रभाग क्रमांक १४ मधील मागणीला नगर परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद; समस्त कॉलनीवासीयांनी मानले नगरसेवकांचे आभार
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरात काही दिवसांपूर्वी नगरपरिषद झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत दोन महापुरुषांच्या चौकांचे नाव देण्याचे प्रस्ताव नगर परिषदेत नगराध्यक्ष नम्रता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता वाला मान्यता देण्यात आली कृषी उत्पन्न बाजार समिती समोर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असे त्या चौकाचे नाव देण्यात आले व गोरगावले फाट्याला महर्षी वाल्मिक ऋषी चौक असे नाव देण्यात आले महर्षी वाल्मिक ऋषी चौक हे नाव देण्यासाठी प्रभाग क्रमांक 14 मधील नगरसेवक रमाकांत ठाकूर यांच्या अथक प्रयत्नांना यश आले चोपडा शहरातील गोरगावले फाट्याचे ‘महर्षी वाल्मिकी चौक’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नामकरणासाठी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या नावाने चौकाचे नामकरण व्हावे, अशी मागणी प्रभागातील नागरिकांकडून करण्यात येत होती. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे गोरगावले फाट्याला महर्षी वाल्मिकी चौक अशी नवी ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाबद्दल कॉलनीतील समस्त रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून, नगरसेवक रामकांत नंथू ठाकूर यांचे आभार मानले आहेत. लोकभावनेचा आदर करून केलेल्या या प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























