मुख्य संपादक विनायक पाटील
निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निंभोरा गावाजवळ गिरणा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनील पाटील यांनी आपल्या पथकासह धडक कारवाई केली. दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २ लाख ५०० रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. या प्रकरणी किरण दिनकर कोळी (रा. निंभोरा, ता. धरणगाव) याच्यासह एकूण १३ आरोपींविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निंभोरा गावालगत गिरणा नदीकाठी अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्ट्या सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनील पाटील यांनी आपल्या पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईदरम्यान गावठी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे मोठ्या व्यवसायाविरोधात पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे परिसरातून स्वागत होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























