Homeताज्या बातम्याचोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान घटना उघड;

मुख्य संपादक विनायक पाटील 

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयित चोराला पोलीस आणि नागरिकांनी रंगेहाथ पकडल्याची घटना १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास श्रीकृष्ण कॉलनी परिसरात घडली. पोलीस निरीक्षक पवन देसले हे रात्री गस्तीवर असताना ही घटना निदर्शनास आली. यावेळी नागरिकांनी संशयिताला पकडून मारहाण केल्याने तो जखमी झाला, तर त्याला ताब्यात घेताना दोन पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण कॉलनीतील महेंद्र वना पाटील यांच्या बंद घरात आरोपी आशिष शिवा चव्हाण (वय १९, रा. कनेहरी, ता. उकशी, जि. धार, मध्य प्रदेश) हा घरफोडी करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आढळून आला. यावेळी नागरिकांनी त्याला पकडले. संतप्त नागरिकांनी आरोपीला मारहाण केल्याची माहिती आहे. या झटापटीत आरोपीसह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान घटना उघड;

या प्रकरणी तक्रारदार हरबल मधुकर भोई (वय ३१, व्यवसाय नोकरी, सिव्हिल इंजिनिअर, पंचायत समिती, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) व ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे ४.४१ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.पोलीस अधिकाऱ्यांची तत्परता

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी पहाटे ३ ते ५ वाजेपर्यंत घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक पवन प्रतापराव देसले, पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी तसेच पोलीस कर्मचारी प्रशांत वाडिले यांनी या प्रकरणी कार्यवाही केली.

विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी पोलीस निरीक्षक पवन देसले स्वतः गस्तीवर असताना ही घटना घडल्याने पोलिसांच्या सतर्कतेमुळे घरफोडीचा प्रयत्न उघडकीस आला. रात्रीच्या गस्तीमुळे चोपडा शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचे लक्ष असल्याचे या घटनेतून दिसून आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

चोपडा नगरपरिषद उद्यानात स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण ‘दीपवंदना’ कार्यक्रम; हजारो पणत्यांनी उजळले परिसर

0
मुख्य संपादक विनायक पाटील    चोपडा (प्रतिनिधी) : स्वर्गीय आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी सुनिल पाटील (वाळकी, चोपडा, जळगाव) यांच्या संकल्पनेतून चोपडा येथील नगरपरिषद उद्यानात...

Translate »
error: Content is protected !!