Homeताज्या बातम्याचोपडा नगरपरिषद उद्यानात स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण ‘दीपवंदना’ कार्यक्रम; हजारो पणत्यांनी उजळले...

चोपडा नगरपरिषद उद्यानात स्वर्गीय अजितदादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भावपूर्ण ‘दीपवंदना’ कार्यक्रम; हजारो पणत्यांनी उजळले परिसर

मुख्य संपादक विनायक पाटील 

चोपडा (प्रतिनिधी) : स्वर्गीय आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी सुनिल पाटील (वाळकी, चोपडा, जळगाव) यांच्या संकल्पनेतून चोपडा येथील नगरपरिषद उद्यानात ‘दीपवंदना’ या भावपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो पणत्यांच्या प्रकाशात आणि भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण सहभागाने संपन्न झाला.

या कार्यक्रमातील प्रत्येक पणतीतून अजितदादांविषयीचा जिव्हाळा, प्रेम आणि आदर व्यक्त होत होता. दादांचा सहवास, त्यांचे प्रेमळ बोलणे, कार्यकर्त्यांशी असलेले आपुलकीचे नाते आणि जनतेसाठी झटण्याची त्यांची तळमळ यांना यावेळी उजाळा देण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना सुनिल पाटील म्हणाले की, “आदरणीय अजितदादा आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि प्रेमाचा वारसा प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत आहे. चोपडेकरांनी प्रज्वलित केलेल्या हजारो पणत्या म्हणजे दादांवरील अढळ प्रेमाची आणि अतूट नात्याची साक्ष आहे. दादांची उणीव प्रत्येक क्षणी जाणवते. जनतेसाठी काम करण्याची त्यांची तळमळ, कामाप्रती असलेली निष्ठा आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. त्यांनी आपल्या कार्यातून असंख्य माणसांच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित केला. आज त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लावलेला प्रत्येक दिवा त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे.”

या भावपूर्ण कार्यक्रमाला माजी आमदार कैलास बापू पाटील, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, जे.डी.सी.सी. बँकेचे संचालक घनश्यामभाऊ अग्रवाल, चोपडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, जे.डी.सी.सी. बँकेच्या माजी संचालिका इंदिराताई पाटील, सहकार बोर्डाचे संचालक प्रवीणभाई गुजराथी, मार्केट कमिटी संचालक नंदकिशोर पाटील, माजी सभापती कांतीलाल बापू, अनिलभाऊ वानखेडे, नगरसेवक रानू दादा, नरेंद्र पाटील, रोहन पाटील, बागवान, सूतगिरणी संचालक शशीकांत पाटील, शेतकी संघ संचालक भाऊसाहेब पाटील, राजूभाऊ बिटवा, राजारामभाऊ पाटील, ॲड. धर्मेंद्र सोनार, संतोषभाऊ आहिरे, सुनील जैन, नेमीचंद जैन, रवींद्र अलीझाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हजारो पणत्यांच्या प्रकाशातून अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा सदैव जिवंत ठेवण्याचा भावपूर्ण संकल्प केला. दादा शरीराने आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणींचा दीप सदैव तेवत राहील, हाच या दीपवंदना कार्यक्रमाचा भावस्पर्शी संदेश ठरला.

— सुनिल पाटील, वाळकी, चोपडा, जळगाव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!