मुख्य संपादक विनायक पाटील
मतदारांच्या आग्रहास्तव निवडणुकीच्या रिंगणात; स्व. तात्यासो आर. बी. पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील समृद्ध वारशाची जपणूक करण्याचा संकल्प
चोपडा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्री. नितीन रामदास पाटील यांनी मतदारांच्या आग्रहास्तव आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदार आणि सहकार क्षेत्रातील सभासदांनी केलेल्या आग्रहाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वर्गीय तात्यासो आर. बी. पाटील यांनी सहकार क्षेत्रात उभा केलेला समृद्ध वारसा आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नितीन रामदास पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतली आहे.
शेतकरी, सहकारी संस्था आणि सभासदांच्या हिताला प्राधान्य देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.
विशेष म्हणजे, स्वतःहून निवडणूक लढविण्यापेक्षा मतदारांच्या आग्रहाला मान देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल. केल्याने त्यांच्या उमेदवारीची जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























