मुख्य संपादक विनायक पाटील
३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार मोबाईल, रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट हस्तगत, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळताना १२ जणांना पकडण्यात आले असून, अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळावरून चार मोबाईल फोन, रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उमर्टी गावातील विशाल कालुसिंग पावरा यांच्या घराच्या आडोशाला काही इसम गोलाकार बसून ५२ पत्त्यांवर झन्ना-मन्ना नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याचे समजले. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पकडण्यात आले.
पकडण्यात आलेल्या १२ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
१) विशाल कालुसिंग पावरा (वय ३३)
२) जालंदर तुकाराम भिल (वय ३४)
३) रणधीरसिंग रमेश पावरा (वय ४२)
४) राजू गिलदार पावरा (वय ५०)
५) शिवदास रामसिंग पावरा (वय ३८)
६) वासुदेव तुकाराम सांगोरे (वय ४५)
७) हरसिंग भंगा पावरा (वय ४०)
८) रमेश प्रताप पावरा (वय ३२)
९) गोविंद छतरसिंग पावरा (वय २७)
१०) अर्जुन धरमसिंग पावरा (वय २४)
११) आबा मेहेरबान पावरा (वय ३८)
१२) अमोल प्रतापसिंग राजपूत (वय ४२)
फरार असलेल्या तीन आरोपींची नावे :
१) दिलीप भिला पावरा
२) बाजीराव रामचंद्र पावरा
३) अरुणसिंग मुन्नासिंग चौहाण
३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, १ हजार ५६० रुपये रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून तो पोलिसांनी ताब्यात घेतला.
याप्रकरणी पोलीस हवालदार मनीष सुरेश मोरे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























