मुख्य संपादक विनायक पाटील
Aspire Foundation नाशिकतर्फे सन्मान; शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव
चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा येथील बालमोहन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप हिरामण चौधरी यांना Aspire Foundation, नाशिक यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चोपडा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल मिळालेल्या या सन्मानामुळे श्री. प्रदीप चौधरी यांच्या कार्याचा गौरव झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी, शिक्षणप्रेमी आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. प्रदीप हिरामण चौधरी यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

✍🏻मुख्य संपादक – विनायक जगन्नाथ पाटील
























