Homeताज्या बातम्याउमर्टीत झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांची धाड; १२ जणांना अटक, तिघे...

उमर्टीत झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांची धाड; १२ जणांना अटक, तिघे फरार

मुख्य संपादक विनायक पाटील 

३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; चार मोबाईल, रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट हस्तगत, महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा तालुक्यातील उमर्टी येथे सुरू असलेल्या झन्ना-मन्ना जुगार अड्ड्यावर चोपडा ग्रामीण पोलिसांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळताना १२ जणांना पकडण्यात आले असून, अन्य तीन आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळावरून चार मोबाईल फोन, रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, उमर्टी गावातील विशाल कालुसिंग पावरा यांच्या घराच्या आडोशाला काही इसम गोलाकार बसून ५२ पत्त्यांवर झन्ना-मन्ना नावाचा हारजितीचा जुगार खेळत असल्याचे समजले. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पंचांसह घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या १२ जणांना पकडण्यात आले.

पकडण्यात आलेल्या १२ आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :

१) विशाल कालुसिंग पावरा (वय ३३)

२) जालंदर तुकाराम भिल (वय ३४)

३) रणधीरसिंग रमेश पावरा (वय ४२)

४) राजू गिलदार पावरा (वय ५०)

५) शिवदास रामसिंग पावरा (वय ३८)

६) वासुदेव तुकाराम सांगोरे (वय ४५)

७) हरसिंग भंगा पावरा (वय ४०)

८) रमेश प्रताप पावरा (वय ३२)

९) गोविंद छतरसिंग पावरा (वय २७)

१०) अर्जुन धरमसिंग पावरा (वय २४)

११) आबा मेहेरबान पावरा (वय ३८)

१२) अमोल प्रतापसिंग राजपूत (वय ४२)

फरार असलेल्या तीन आरोपींची नावे :

१) दिलीप भिला पावरा

२) बाजीराव रामचंद्र पावरा

३) अरुणसिंग मुन्नासिंग चौहाण

३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३१ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन, १ हजार ५६० रुपये रोख रक्कम आणि ५२ पत्त्यांचा कॅट असा एकूण ३२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून तो पोलिसांनी ताब्यात घेतला.

याप्रकरणी पोलीस हवालदार मनीष सुरेश मोरे यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकटूकी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा १६ टायर ट्रक पकडला; महसूल पथकाची धडक कारवाई!

0
धरणगाव (प्रतिनिधी राजू बाविस्कर)   तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई; मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांचा सहभाग, अवैध गौण खनिज वाहतूकदारांना प्रशासनाचा इशारा   धरणगाव...

चोपड्यात औद्योगिक वसाहतीतील वेल्डिंग वर्कशॉप फोडले; ९५ हजारांचा ऐवज चोरीला!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    सुपर वेल्डिंग वर्कशॉपच्या शटरचे कुलूप तोडून लोखंडी प्लेटसह वेल्डिंग मशीन व ड्रिल मशीन लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल   चोपडा (प्रतिनिधी) :...

चोपड्यात महावितरणतर्फे अभय योजना व स्मार्ट सोलर योजनेबाबत जनजागृती!

0
मुख्य संपादक विनायक पाटील रामपुरा परिसरात वीज ग्राहकांना योजनांची माहिती; थकबाकीवरील व्याज व दंड माफीसह पात्र ग्राहकांना अल्पदरात सोलर पॅनल बसविण्याचे आवाहन   चोपडा (प्रतिनिधी) : महावितरणतर्फे...

चोपड्यात रात्री घरफोडी करताना चोर रंगेहाथ पकडला; नागरिकांनी केली मारहाण!लीस निरीक्षक पवन देसले यांच्या...

0
मुख्य संपादक विनायक पाटील    पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नाईट पेट्रोलिंगदरम्यान कारवाई; दोन पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी, घरफोडीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक   चोपडा (प्रतिनिधी)...

चोपडा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची धरणगावात धडक; अवैध गावठी दारूभट्ट्यांवर छापा!

0
मुख्य संपादक विनायक पाटील    निंभोरा येथे गिरणा नदीकाठी मोठी कारवाई; २ लाख ५०० रुपयांचे कच्चे रसायन नष्ट, किरण कोळीसह १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल धरणगाव (प्रतिनिधी) :...

Translate »
error: Content is protected !!